'P' of #AtoZChallenge
लहानपणापासून पु.लंचं घरी येणं जाणं असायचं!
कधी cassette मधून गोष्ट सांगायचे,
कधी radio वरून गाणी ऐकवायचे.
आणि भरपूर वेळा आई आणि आजी मला त्यांची पुस्तके वाचून दाखवतं.
मला तर ते माझे आजोबाच वाटायचे!
किती गोष्टी सांगत, किती हसवत!
जास्त करून त्यांच्या गम्मतीदार गोष्टी ऐकल्यामुळे ते माझ्यासाठी खूप मोठा Source of Happiness होते आणि अजूनही आहेत!!
मी सहावीत होते तेव्हा ते गेले.
मी पहिल्यांदा कोणाच्या 'जाण्यावरून' एवढी रडली असेन!
तेव्हा तर मला फारशी idea पण नव्हती की, ते नक्की कोण आणि कित्ती मोठे आहेत!
मला माझेच आजोबा गेले असं वाटलं!
दुसऱ्या दिवशी आणि त्या नंतर झालेल्या media coverage नंतर कळलं की फक्त मी नाही ते सगळ्यांचेच favourite आजोबा आणि Once in a Lifetime Phenomenon होते !
त्यानंतरच्या दिवसात, सगळ्याच channels वर त्यांची नाटकं, गाणी, काथा-कथान, जुने films broadcast केले!
खूप blessed वाटलं की मी ते असताना जन्माला आले, आणि मला ते थोडेसे मिळाले!
आणि त्याहून आनंद झाला की त्यांची आणि माझी एकच भाषा असल्यामुळे मी त्यांचे सगळे original works चा खरा आनंद घेऊ शकते!
तेव्हा एकदा Sundayला सह्याद्री वाहिनी वर 'गुळाचा गणपती' लागला होता.
मी तो पूर्ण बघितला!
तेव्हा शाळेत आम्हाला 'पु. लं वर' काहीतरी लिहून आणायला सांगितलेला.
मी तो picture बघता बघता पु. ल special scrap book केली.
गुळाचा गणपती बघून मला नंतर बरेच वर्षं मोठा झालेला 'गणपती' पु. लं सारखा दिसतो असं वाटायचं!
तुम्ही पण जरा जवळून बघितला तर तुम्हाला पण similarities दिसतील!
मी अजून त्यांचा खजीना पूर्णपणे उघडून बघितला ही नाहीये!
एवढं सगळं आहे!
त्यांनीं लिहिलेली, गायलेली, compose केलेली गाणी, नाटकं, films, पुस्तकं, लेख, व्याख्याने!
नेहमी काहीतरी त्यांच्या बद्दल नवीन information कळते,
म्हणजे 'हे' ही गाणं त्यांनी लिहिलेला आणि त्याला music दिलेलं?
म्हणायला काहीच हरकत नाही की ते माझ्या 'लेखी' जीवनाचे खूप मोठे Influence आहेत!
पु. ल सगळ्यांचेच लाडके होते,
पण ते प्रत्येकाला 'आपलेसे' वाटायचे,
Shared but personal!
ते नसूनही असल्यासारखे वाटतात.
अजूनही ते त्यांच्या गोष्टींमधून कित्ती हसवतात, त्यांच्या गाण्यातून तल्लीन करतात,
सर्व सामान्य माणसाला, परिसथितील किती गमतीने बघतात!
त्यांचे approach, perspective, विचार किती Timeless and ageless आहेत!
अश्या व्यक्तिमत्वाच्या दुनियेत राहिला मिळावं,
हीच गोष्ट किती special आहे!
मग अश्या व्यक्तिमत्वाचे संसकार ज्यांच्यावर झाले आहेत,
त्यांनी काहीतरी नं करून दाखवणंतरी शक्य आहे का?
(image courtesy: Google images)
Comments
I hope you and your family are staying safe and healthy during this difficult time.
J Lenni Dorner~ Co-host of the #AtoZchallenge, Debut Author Interviewer, Reference& Speculative Fiction Author