प्रिय मुलुंड,
मी तुला खुपचं miss करते!
मी ह्या जागच्या पाठीवर कुठेही राहीले तरी,
तूचं माझं कायमचं घर अशील!
तुझ्या रस्त्यांमध्ये एक वेगळीचं warmth आहे, ओलावा आहे, comfort आहे !
दूर बसूनही मी बऱ्याचदा तुझ्या रस्त्यांमध्ये रमतगमत फिरत असते.
बरंच काही शोधात असतें, बर्याच आठवणी आठवतं असते!
कदाचित मी त्या ओळखीच्या रस्त्यांवर,
स्वतःचीच पुसट झालेली ओळख शोधत असेन ?
माझ्या मुलुंड पूर्व मध्ये कोणी हरवूनही हरवणार नाही!
सगळे रस्ते, सगळे गल्ले, सगळे कोपरे,
अगदी जाणून आहे मी!
लांब चालतही गेले ना, तरी घरी परतायचा रस्ता सापडतोच!
गोल आणि छोटं आहे नं माझं मुलुंड East!
कुठूनही सुरु केलं तरी तिथंच येऊन पुन्हा सुरु करू शकतो!
ती झाडं, ती सावली पण लक्षात आहे,
अगं मीच काय,
तुझ्या त्या Saidhan जवळच्या झाडावर पण,
पीढोन-पीढी राहणाऱ्या चिमण्या पण दर संध्याकाळी तेवढाच किलबिलाट करतात!
खाली रस्त्यावर दर महिन्याला वाढणारा traffic कितीही असला,
तरी किलबिलाट तेवढाच जोरात असतो!
वडापाव, दाबेली आणि पाणीपुरी मिळते नं जगभर (atleast मुंबईत),
तरी मुलुंड East मधल्या समर्थ वडापाव, हनुमान चौकची दाबेली आणि सुयोगची पाणीपुरी खाल्ल्या शिवाय खाल्यासारखं वाटतंच नाही! आणि हो! हरीओमचा सामोसा ही !
कडधान्य, सुका खाऊ, अगदी कंगवा-रबबर पण मिळतं नं online आणि supermarket मध्ये,
पण तरी ते सहकार, हरिओम आणि ज्योती/विधता कडून नसतील, तर ते घेतल्यासारख्या वाटत नाहीत!
मी जरी मुलुंडला घरी गेले,
तरी यशोमंदिर च्या गल्लीत, टिळक रोड, हनुमान चौक, स्टेशन, देशमुख गार्डन, संभाजी, मुलुंड जिमखाना इथे फिरले नाही तर सगळ्यांना भेटले असं वाटतंचं नाही!
काय नं, अगदी ऑफीस मधून येतांना बाराच्या पुढेही आले नं,
तरी रात्री भरपूर जाग असते आणि protected वाटायचं!
स्टेशन वर गणपती भेटायचा, मग आजीचं घर यायचं,
मग हनुमान चौकात मारुती थांबलेला असायचाच!
पुढे माझी लक्ष्मीबाई शाळा, साईधान, जिमखाना, आई आणि माझी ओळखीची बकुळीची झाडं असायची,
मग काय highway च्या पलीकडे आमचा राहतं घर यायचं!
येवढी कंपनी असायची, दिवसाच्या वाट्टेलत्या वेळी की मग,
घरीच फिरतोय आपण असंच वाटायचं मला!
आता जेव्हा मुलुंडला मी आई-बाबांना, मित्र-मैत्रिणीना भेटायला येते,
तेव्हा ह्या माझ्या हक्काच्या मुलुंड East च्या घरात,
फेरफटका मारला नाही तर,
घरी आलेलं वाटतं नाही!
ऐकलंस का गं, मुलुंड East,
I miss you, गं !
तुझी,
अमू :)
Comments
Mala vicharle tar -
Nerul Station chi "Dabeli" ani "Chembur Sadguru" cha Pav Bhaji.
Mulund misses you too 🤧♥️
Asa vatal ek feri marun ale Mulund East madhe 😁♥️♥️