Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

First Day of School

'S' of AtoZ Challenge  शाळेचा पहिला दिवस  जून महिना आला की शाळा आठवते! आपण कितीही वर्षाचे असू,  तरी शाळेच्या नवं वर्षाची ती उत्सुकता आठवतेच !  जून सुरु झाला की थोडातरी पाऊस पडतोच!  मग आई बाबांबरोबर दुकानात जाऊन,  नवीन इयत्तेची पुस्तके आणायची trip आठवते.  नवीन textbooks, notebooks, pencil box, pencils, water bottle, अगदीच जुनी झाली असेल तर नवीन school bag...  अश्या सर्व नवीन ,कोऱ्या वस्तू आणून, घरी येऊन त्या सर्व बाहेर काढून, त्यात नाक खुपसून त्याचा वास घेणे!  अहाहा! It was the smell of 'Newness'!  तेव्हाच खऱ्या अर्थाने  शाळेचा नवीन वर्ष सुरु व्हायचं !  घरी येऊन शाळा उघडायच्या अगदी तीन-चार दिवसांपूर्वीच, आई माझी सर्व पुस्तकांना नवीन brown covers घालायची! आणि ती ताठ आणि कडक मस्त बसायची! तशी covers मी नंतर 7th-8th मध्ये गेल्यावरही मला जमली नाही! मग नवीन uniform, तुटली नसेल तर नवीन छत्री,  आणि पायाची size जास्त मोठी  झाली नसेल तर,  नवीन...